पिसाळ - देशमुख परिवारास सांत्वन पर भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
चआकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज : नातेपुते (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती सरस्वती तात्यासाहेब पिसाळ देशमुख यांचे दिनांक19/5/2026 रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.ॲड. विलासराव तात्यासाहेब पिसाळ देशमुख, सुकुमार तात्यासाहेब पिसाळ देशमुख, दत्तात्रय पिसाळ देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.
माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी पिसाळ - देशमुख परिवाराची सांत्वन पर भेट घेऊन कै.श्रीमती सरस्वती तात्यासाहेब पिसाळ - देशमुख यांचे प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


0 टिप्पण्या