सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट संपन्न


सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/06/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.  २९ मे २०२६ रोजी पदवी द्वितीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक अँड टेल कमुनिकेशन विभागाची औद्योगिक भेट ठाणे मुंबई येथील  बीएसएनएल सॅटेलाइट अर्थ स्टेशन येऊर ठाणे  ला भेट देण्यात आल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी दिली.    

या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, नवकल्पना (Innovation) आणि स्टार्टअप संस्कृती बीएसएनएल सॅटेलाइट अर्थ स्टेशन, येऊर (ठाणे, महाराष्ट्र) हे भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चे एक प्रमुख उपग्रह दळणवळण केंद्र आहे. हे केंद्र ठाण्यातील निसर्गरम्य येऊर हिल्स (Yeoor Hills) परिसरात स्थित असून, दुर्गम भागात आणि आपत्कालीन परिस्थितीत अखंडित दूरसंचार सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते。

या औद्योगिक भेटीतून विद्यार्थ्यांना उत्पादन अभियांत्रिकी, गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक सुरक्षा आणि उत्पादन व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. तसेच उद्योगातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि तांत्रिक अचूकतेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजले.

ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरली. महाविद्यालयाच्या वतीने बीएसएनएल सॅटेलाइट अर्थ स्टेशन (BSNL Satellite Earth Station) हे ठाण्यातील येऊर व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.

या औद्योगिक भेटीमुळे द्वितीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील  विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीलाच उद्योग क्षेत्राची  ओळख झाली. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून उद्योगातील आव्हाने, संधी आणि भविष्यातील दिशा समजून घेतली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना व उद्योजकतेबद्दलची आवड निर्माण होण्यास मदत झाली.

महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या भेटीचा उत्साहाने सहभाग घेतला आणि ती त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.

या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे  मार्गदर्शन लाभले तसेच पदवी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.अनिल कोकरे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन व्हिजिट समन्वयक म्हणून प्रा. कोमल पोळ यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या