अधिक मासानिमित्त निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर स्वामी महाराज यांचा बिनावा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/06/2026 :
नऊचारी - बागेचीवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील बाळासाहेब गवसने यांच्या निवासस्थानी अधिक मासानिमित्त रुद्र पशुपती कोळेकर स्वामी महाराज यांचा बिनावा आयोजित करण्यात आला होता. त्या बिनाव्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी सदिच्छा भेट देऊन कोळेकर महाराजांचे दर्शन घेतले. त्यावेळेस अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, बाळासाहेब गवसने, शेखर ढोले, पप्पू स्वामी इत्यादींसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने बाळासाहेब गवसने आणि परिवाराच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.

0 टिप्पण्या