मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/06/2026 :
झोप किंवा विश्रांती हा निरोगी आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. आहार, व्यायाम याच्या जोडीला पुरेशी व शांत झोप गरजेची असते. आपल्या थकलेल्या शरीराला व मेंदूला झोप आवश्यक असते.
साधारण रात्री १० पर्यंत तरी नक्की झोपावे. झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी एखादी प्रार्थना म्हणावी किंवा आजचा दिवस चांगला गेला म्हणून देवाचे आभार मानावेत.
शांत झोप लागते तेव्हा पूर्ण शरीराला आराम मिळतो. शरीरातील आंतरिंद्रियांचे काम चालूच असते. दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी ठेवणे, भावनिक गोष्टींच्या नोंदी ठेवणे, अभ्यासाच्या गोष्टी लक्षात ठेवणे हे मेंदूचे कार्य चालू असते.
आजचा संकल्प
झोप म्हणजे वेळ वाया घालवणे नसून दररोजच्या दगदगीनंतर शरीराला आवश्यक असणारी व मेंदूला कार्यक्षम बनवणारी एक महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात घेऊ व पुरेशी झोप घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या