अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता यांच्यावतीने स्व. चौधरी ब्रह्मप्रकाश यादव यांची 108 वी जयंती साजरी

 

अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता यांच्यावतीने स्व. चौधरी ब्रह्मप्रकाश यादव यांची 108 वी जयंती साजरी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/06/2026 : अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) येथून प्रसिद्ध होत असलेल्या अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताच्या वतीने  वृत्त एकसताच्या कार्यालयात स्व.चौधरी ब्रह्म प्रकाश यादव (16/6/ 1918 - 11/8/1993) यांची 108 वी जयंती साजरी करण्यात आली.

मंगळवार दिनांक 16/6/2026 रोजी सकाळी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्त एकसत्ता चे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी वृत्त एकसत्ताच्या कार्यालयात स्व. चौधरी ब्रह्मप्रकाश यादव यांच्या जयंतीनिमित्त च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्ली प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री स्व. चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांच्या 108 व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.जयंतीचे औचित्य साधून "सम्यक विचार मंच अकलूज" चे अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे यांनी "भारताचे संविधान" ची प्रत एन.यु.बी.सी. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना भेट दिली; आणि महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चौधरी ब्रह्मप्रकाश यादव यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमच्या "सम्यक विचार मंच अकलूज" च्या वतीने भारताचे संविधान ची प्रत जास्तीत जास्त युवा पिढी च्या हातामध्ये देण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत असे म्हटले. 

याप्रसंगी सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सम्यक विचार मंच अकलूजचे अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे, कार्याध्यक्ष प्रभाकर बलभीम पाटील, उपाध्यक्ष राजीव रामचंद्र खरात, सचिव विलासनंद विठ्ठल गायकवाड, सहसचिव आदिनाथ मोहन जाधव, अभिजीत विलासनंद गायकवाड, राजू आगंद गायकवाड, अजित तानाजी धाईंजे, लक्ष्मण भगवान बनसोडे , नितीन उत्तम भोसले, प्रशांत पंडित खरात आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार अभिजीत विलासनंद गायकवाड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या