पुनर्मूल्यांकनानंतर टेंभुर्णीच्या महात्मा फुले ची कु. अद्या सिद्धेश्वर शिंदे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रात प्रथमॅ...
वृत्त एकसत्ता न्यूज
टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) :
फेब्रुवारी - मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा 6 मे 26 रोजी रिझल्ट लागल्यानंतर महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी ची विद्यार्थिनी कु. अद्या सिद्धेश्वर शिंदे हीने 99.40% गुण मिळवून माढा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. अद्या हिस आपणास शंभर टक्के गुण मिळतील असा आत्मविश्वास होता . त्यामुळे महात्मा फुले विद्यालयाचे चे संस्थापक नारायण भानवसे यांनी व इतर शिक्षकांनी कु. अद्या शिंदे हिच्या सर्व पेपर्सचे
पुनर्मूल्यांकन व्हावे अशी इयत्ता दहावीच्या बोर्डाकडे विनंती केली .त्यानुसार तिच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन होऊन कु. अद्या शिंदे हीस सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले असून सरासरी 100% टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत कुमारी अद्या शिंदे हिचा प्रथम क्रमांक आलेला असल्याचे दहावीच्या बोर्डामार्फत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे .कु. अद्या शिंदे ही बेंबळे येथील रहिवासी असून पत्रकार सिद्धेश्वर शिंदे व सौ अनुराधा शिंदे यांची कन्या आहे. या यशामुळे कु. अद्या हिने टेंभुर्णीच्या महात्मा फुले विद्यालयाचा तसेच बेंबळे गावाचा नावलौकिक वाढवला आहे. याबद्दल कु. अद्या हिचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. कु. अद्या शिंदे हिच्या यशामुळे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत महात्मा फुले विद्यालयचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी महाराष्ट्रात प्रथम येण्याची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावी बोर्ड परीक्षेत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे माढा तालुक्याचे आमदार मा. अभिजित आबा पाटील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे, जिल्हा परिषद सोलापूर महिला व बालकल्याण सभापती ॲड. अमृताताई वाघे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण भानवसे, विद्यालयाचे प्राचार्य विजय यादव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शोएब बागवान, शिक्षक पालक संघ व संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

0 टिप्पण्या