मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/06/2026 :
दिवस-रात्र हा दिनक्रम प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेला असतो. दिवसभर काम व रात्री आराम. पहाटे किंवा सकाळी जाग येते व रात्री सर्व आवरले की डोळे मिटू लागतात.
साधारणपणे सर्वांचे असेच असते. ज्यांचे रात्रपाळीचे काम असते त्यांचा दिनक्रम थोडा वेगळा राहतो. रात्रीची कमीत कमी सहा ते सात तास शांत झोप आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक. यामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य चांगले राहते.
मात्र हल्ली तरुणांची निम्मी रात्र मोबाईलवर गेम खेळण्यात जाते. पूर्वी अभ्यासासाठी जागरण केले तरी पालकांचे लक्ष असायचे. हल्ली पालकांनी लक्ष घालणं चुकीचे ठरते. निम्म्या अधिक पालकांची त्या काळजीपोटी झोप उडते तो वेगळा विषय.
आजचा संकल्प
प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने रात्रीची झोप गरजेची आहे. रात्रीला दिवस समजून विनाकारण नैसर्गिक चक्राच्या विरोधात न जाता शांत झोपेची आराधना करू व आरोग्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या