विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/06/2026 :
सध्या पाणी कपात याविषयी सर्वत्र चर्चा ऐकायला, वाचायला मिळते. निम्मा जून महिना संपला तरी पावसाची सुरुवात नाही. मान्सून उशिरा येणार अशा बातम्या आहेत. धरणातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे.
यावर उपाय काय तर पाऊस पडेपर्यंत सध्या उपलब्ध असलेले पाणी जपून वापरणे. कमीत कमी पाण्यात स्वच्छतेची कामे करणे. बादलीत पाणी घेऊन गाड्या कापडाने पुसणे, शक्य तिथे पाण्याचा पुनर्वापर करणे वगैरे.
मुलांनो, ही सवय नेहमीसाठी लावून घ्या. पाणयाचा अपव्यय करणे, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणे किंवा पाणी वाया घालवणे या चुकीच्या सवयी भविष्याच्या दृष्टीने सर्वांनाच घातक आहेत.
पाणी कपात करण्याची सवय लावून घ्या अन्यथा कपातून पाणी प्यावे लागेल.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या