विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/06/2026 :

दैनंदिन जीवनात आपण देवाण-घेवाण प्रकार पाहतो. म्हणजे अगदी शेजारून वाटीत भाजी आली तर ती वाटी परत देताना आपण पण त्यात काहीतरी घालून देतो.

मंगल कार्यात आहेर केला तर प्रती आहेर देतो. वाढदिवसाला भेटवस्तू आणली की आपण पण त्यांना छोटी भेट देतो. थोडक्यात काय तर कृतज्ञतेतून आपण त्यांना फूल ना फुलाची पाकळी या स्वरूपात काहीतरी उपयोगी गोष्ट देतो.

मुलांनो, निसर्ग आपल्याला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी भरभरून देतो. त्यांना आपण बदली काय देतो? नद्या-विहिरी पाणी देतात, हवा ऑक्सिजन देते. त्या बदली आपण काय देतो? तर पाणी, हवा दूषित करतो सगळे, प्रदूषित करतो.

या कृतघ्नपणाला काय म्हणायचे? आपले हे वागणे तुम्हाला पटते का? विचार करा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या