जागतिक योग दिनानिमित्त शंकरनगर येथे योग साधना शिबिर संपन्न

जागतिक योग दिनानिमित्त शंकरनगर येथे योग साधना शिबिर संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/06/2026 :

ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल शंकरनगर-अकलूज तसेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अकलूज शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले योग साधना शिबिर भव्यतेने संपन्न झाले.

ग्रीन फिंगर्स स्कूलच्या ओपन ऑडिटोरियममध्ये झालेल्या शिबिरासाठी योगतज्ज्ञ प्रा.धनंजय देशमुख (एम.ए.योगशास्त्र) यांनी विशेष मार्गदर्शन केले.उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, कपालभाती आदींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी योग शिक्षिका सौ. वैशाली साळुंखे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.

याप्रसंगी डॉ.उत्तम खरात,डॉ.सुधीर पोफळे (सेंट्रल निमा सदस्य), डॉ.अमोल माने (अध्यक्ष,निमा अकलूज), डॉ.प्रशांत निंबाळकर (अधिष्ठाता,ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल), डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील, डॉ.संदेश गुळुमकर, डॉ.वल्लभ कुलकर्णी, डॉ. निलंबरी मगर, डॉ.तहमीम देशमुख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, हॉस्पिटल कर्मचारी व योगप्रेमी नागरिकांनी योग शिबीराचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सत्यजित खताळ यांनी केले.

"योग हा निरोगी जीवनाचा पाया असून शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे," असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या