विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/06/2026 :

 "देशसेवा" म्हणजे नेमके काय? तुम्हाला प्रश्न पडत असेल ना? मोठे झाले की सैन्यात भरती व्हायचे. शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करायचे, सीमेवर बंदूक घेऊन उभे रहायचे असे सगळे डोक्यात असेल ना?

देश शत्रूपासून वाचवण्याचे कर्तव्य सैनिक बंधू करतात तसे देशातील काही शत्रू आपण नेस्तनाबूत करू शकतो. जसे की सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही व झाला तर आम्ही तो स्वच्छ करू हे कृतीतून करणे.

मुलांनो, अंधश्रद्धा न ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणे, जातीय सलोखा ठेवणे, एकमेकांना सहकार्य करणे, मोठ्यांची आज्ञा पाळणे, स्वतःचे आरोग्य जपणे, निव्यसनी रहाणे, नीतिमत्ता पाळणे या व अशा अनेक प्रकारे आपण देशसेवा करू शकतो.

'हा देश माझा, मी देशाचा' या भावनेतून आपले वर्तन ठेवू व देशसेवा करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या