विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/06/2026 :

जून महिना म्हणजे उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपून शाळा पुन्हा सुरू होण्याचा आनंदाचा काळ! नवी इयत्ता, नवीन पुस्तके-वह्या, नवीन अभ्यासक्रम, नवीन वर्गखोली, नवीन शिक्षक आणि सोबतीला थोडेफार नवीन मित्र!

शाळेचा पहिला दिवस तर पूर्णपणे भारावलेला असतो. हातामध्ये नवीन वेळापत्रक पडले की, त्या त्या विषयांना आपल्याला कोणते शिक्षक शिकवणार, याची मनाला मोठी उत्सुकता असते; आणि त्यातही आपले आवडते शिक्षक वर्गात आले की, बालमनाला होणारा आनंद काही वेगळाच असतो.

मुलांनो, शालेय जीवनातील हे सोनेरी दिवस खरोखरच अविस्मरणीय असतात. आपल्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया इथेच तयार होतो. आपल्यावर उत्तम संस्कार इथेच होतात आणि आपले व्यक्तिमत्त्व देखील इथेच घडते. म्हणूनच, हे सुंदर शालेय दिवस तुम्ही आनंदाने आणि मनापासून अनुभवा.

नवनवीन गोष्टी शिका, मोठे व्हा आणि सुसंस्कारी व सुजाण नागरिक व्हा!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या