विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/06/2026 :
शाळेत आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आवडीचे किंवा नावडीचे असतात. ज्यांना भाषा विषयाची गोडी असते, त्यांना गणित जमेलच असे नसते. तर गणित-विज्ञानाची गोडी असणाऱ्यांचे अनेकदा व्याकरण मार खाते.
गणिताच्या तासाला अनेकदा आकडे डोळ्यांपुढे फेर धरतात, तर चिन्हांची आदला-बदल होते. उत्तराचा मेळ काही केल्या बसत नाही; कारण नको ती चिन्हे नको तिथे येऊन बसलेली असतात.
मुलांनो, असे अनेकजणांच्या बाबतीत होते. त्यासाठी शिक्षक वर्गात शिकवत असताना, ते नेहमी लक्षपूर्वक ऐका. फळ्यावर सोडवलेले गणित नीट पहा आणि समजून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आवडीने तो विषय शिकायचा! "अमुक एक विषय आवडत नाही," असे आधीच मनात ठरवले की, तो विषय कधीच समजत नाही.
त्यामुळे वर्गात प्रत्येक तासाला लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्या विषयात प्राविण्य मिळवा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या