मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/06/2026 :

आपण आपल्या बाबतीत काही चांगले घडो, वाईट घडो त्याला आपले प्रारब्ध समजतो. भाग्य, नशीब असे  म्हणतो. खरे तर आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी नशिबावर ढकलणे चुकीचे वाटते.

आपले विचार, आपले प्रयत्न, जिद्द, चिकाटी, भरपूर कष्ट किंवा अभ्यास करण्याची तयारी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता व सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मविश्वासाने केलेली कृती आपले कर्म घडवत असते.

थोडक्यात काय तर या सर्वातून जसे यश मिळते तसे यांची उणीव राहिली तर अपयशाचे धनी होतो. यात नशिबाचा भाग कुठे येतो? नशिबाला दोष देणे म्हणजे स्वतःचे कर्तृत्व नाही हे अप्रत्यक्षपणे कबूल केल्याप्रमाणे असते.

आजचा संकल्प

असेल हरी तर देईल पलंगावरी या भरवशावर राहून स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेण्यापेक्षा प्रयत्नपूर्वक ध्येयप्राप्त करू व प्रारब्ध बदलू.

सौ. स्नेहलता स. जगताप.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या