विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/06/2026 :
दररोजचे वर्तमानपत्र वाचले किंवा दूरदर्शनवरील बातम्या पाहिल्या, की एक गोष्ट तीव्रतेने जाणवते, ती म्हणजे 'रस्ते अपघात'. दररोज शेकडो निष्पाप लोक वाहनांखाली चिरडले जात आहेत किंवा भीषण अपघातांमुळे आपले प्राण गमावत आहेत.
सध्या रस्त्यावर वावरताना प्रत्येकालाच पुढे जाण्याची आणि लवकर पोहोचण्याची प्रचंड घाई असते. 'अतिवेग' हेच बहुतेक अपघातांचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण आहे. वाहने इतक्या वेगात चालवली जातात की, अचानक समोर काही अडचण आली, तर त्यावर नियंत्रण राखणे चालकाला अवघड होते; आणि हा निष्काळजीपणा स्वतःसोबतच रस्त्यावरील इतरांसाठीही प्राणघातक ठरतो.
मुलांनो, तुम्ही अजून लहान आहात; पण आत्तापासूनच वाहतुकीचे नियम नीट समजून घ्या. रस्ता सुरक्षेचे नियम आणि अटी माहिती करून घ्या. लहान वयातच छुप्या पद्धतीने गाडी चालवण्यात कसलीही धन्यता मानू नका. उलट, वयाची अट पूर्ण होऊन अधिकृत वाहन चालक परवाना (Driving License) मिळाल्याशिवाय कधीही गाडी चालवू नका.
आपल्या वागण्यामुळे स्वतःसोबतच इतरांनाही रस्त्यावर सुरक्षित वाटेल, यासाठी नेहमी दक्ष आणि जबाबदार राहा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या