बैल गेला आणि झोपा केला
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/06/2026 :
मराठी भाषा ही इतकी समृद्ध आहे त्यामध्ये मागील पाच हजार वर्षे व पुढील पाच हजार वर्षे टिकतील अशा म्हणी आहेत.
त्यापैकी एक म्हणजे बैल गेला आणि झोपा केला.
बैल दावे तोडून पळून जाईल म्हणून अनेक वेळा विचार करूनही झोपा म्हणजे गोठा बांधला नाही व नंतर बैल दावा तोडून पळून गेल्यावर गोठा बांधला झोपा केला म्हणजे हे पश्चात बुद्धीचे लक्षण आहे.
गेले दोन-तीन महिने ऑपरेशन टायगर सर्वच मीडियावर गाजत होते ऊबाठाच्या नऊ पैकी सात खासदार फुटणार अशी जोरदार बातमी होती.
आणि अखेर आज सहा खासदार फुटले त्यांनी वेगळा गट स्थापन केला त्या वेगळ्या गटाला मान्यता मिळाली तो वेगळा गट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाला
आणि यांना जाग आली
उबाठा शिवसेनेच्या कायदेशीर सल्ला देणाऱ्यांच्या बद्दल मला नेहमी कौतुक वाटत आले आहे यांना कायदा कळत नाही का यांचाही मुखलेप झालेला आहे हे समजून येत नाही घंटा तज्ञ म्हणून अख्खा महाराष्ट्र ज्यांची वाखाणणी करत आहे असे दोन कायदे तज्ञ उद्धव ठाकरे संजय राऊत यांना सल्ला देत असतात व त्याप्रमाणे हे बडबडे आणि घर बशे नेते अंमलबजावणी करत असतात.
व्हीप सोमवारीच काढला असता तर ?
गेले चार महिने ऑपरेशन टायगर सुरू आहे परवाच्या रविवारी तर सर्वांची खात्री झाली की आता सहा खासदार फुटणार
आज सहा खासदार फुटून त्यांचा गट बनवून त्यांच्या गटाला मान्यता मिळून तो गट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाला.
आणि उबाठा शिवसेनेने उद्या व्हीप काढून आपल्या खासदारांची मिटिंग बोलवली आहे त्यात ह्या सहा खासदारांना बोलवण्यात येणार आहे आणि ते जर मिटींगला हजर राहिले तर त्यांना पक्षातून काढणार आहे म्हणजे त्याना खासदारकीला मुकावे लागेल असा मीटिंग आयोजीत करणाऱ्याचा कयास आहे.
यांचा बैल पळून गेल्यानंतर यांनी झोपा केलेला आहे
आता जे खासदार आता तुमच्या पक्षाचे नाहीत त्यांना तुम्ही कसे बोलवीणार व त्यांच्यावर कारवाई कशी करणार हे संजय राऊत व त्यांचे घंटा तज्ञ कायदेशीर सल्लागार सांगू शकतील
चार वर्षा पूर्वीची गोष्ट
चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना घेऊन बंड केले
इकडे मुंबईत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पक्षप्रमुख होते ते व त्यांच्ये अनुयायांनी पन्नास खोके 50 खोके म्हणत बसले त्याऐवजी पक्षातील आमदारांची व्हीप काढून बैठक बोलली असती व त्या बैठकीला गैरहजर असणारेना पक्षातून निलंबित केले असते तर ते आपोआपच अपात्र झाले असते
किंवा विधिमंडळाचे अधिवेशन बोलावून विश्वास दर्शक ठराव मांडून या ठरावासाठी त्यावेळच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान करावे असाही व्हीप काढला असता तरीही कदाचित ठराव नामंजूर झाला असता पण हे 40 आमदार आपोआपच अपात्र झाले असते. माननीय सर्वोच्च न्यायालयांनी पण त्यांच्या निर्णयात याविषयी टिप्पणी केली आहे.
दोष तुमच्या नाही
जे घंटा तज्ञ कायदेशीर सल्लागार तुम्हाला सतत फसवत राहिले आहेत त्यांचा दोष आहे त्यांना कायदा कळत नाही का त्यांचा मुखलेप झालेला आहे हे समजून येत नाही.
अशा प्रकारे उबाठा शिवसेनेच्या बाबतीत बैल गेला आणि झोपा केला अशी गत झालेली आहे.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

0 टिप्पण्या