🟠 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित् अंगणवाडीत गणवेश व खाऊ वाटप
🔵 नगरसेविका सौ.प्रतिभा विलासनंद गायकवाड यांचे योगदान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/06/2026 :
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित् अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड यांचे वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प माळशिरस अंतर्गत अकलूज येथील अंगणवाडीतील देऊळवाले समाजातील मुला मुलींना प्रमुख प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेश व खाऊचे वाटप करण्यात आले. प्रारंभी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते होऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका सौ प्रतिभा विलासनंद गायकवाड यांनी अंगणवाडीतील येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच देऊळवाले समाजातील मुला मुलींना आधार कार्ड साठी जन्माचा पुरावा सापडत नसल्यामुळे त्यांना आधार कार्ड काढणे अवघड आहे त्या भागात आधार कार्ड संदर्भात कॅम्प लावण्यात येईल असे माता भगिनींना सांगुन, आपली नवविवाहित मुलगी वैष्णवी शुभम सोंडे हिच्या वाढदिवसानिमित्तचा खर्च टाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपेक्षित आणि गरजू मुला मुलीना खाऊ वाटप उपक्रम राबवित असल्याचे म्हटले.
यावेळी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, वृत्त एकसताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड, पत्रकार सतीश आडगळे, सम्यक विचार मंच अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे, शुभम विकास सोंडे, वैष्णवी शुभम सोंडे, तक्षशील संतोष गायकवाड, आदिनाथ मोहन जाधव, शिवाजी दादासाहेब मागाडे, अंगणवाडी सेविका सुजाता संदीप शहा, मदतनीस प्रियंका रुपेश पोटे, अंगणवाडीतील मुला मुलींचे पालक उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका सुजाता संदीप शहा, मदतनीस प्रियंका रुपेश पोटे, यांनी शुभम विकास सोंडे आणि सौ. वैष्णवी शुभम सोंडे यांना गिफ्ट देऊन सन्मानित करून सर्वांचे आभार मानले.




0 टिप्पण्या