विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/06/2026 :
शाळेत आपल्याला राष्ट्रभक्तीपर गीते चालीत म्हणायला शिकवतात. प्रथम ती वहीत लिहून देतात व नंतर सर किंवा मॅडम चालीत म्हणतात, त्यांच्या मागे तुम्ही म्हणता. म्हणून म्हणून ती पाठ होतात.
प्रत्येक गीतामधील अर्थ लक्षात घ्या. अनेक गीतांमध्ये स्वतःला उद्देशून काही सूचना असतात तर काही गीतांमध्ये तुम्हाला शिक्षक किंवा मोठी माणसे काही तरी संदेश देत असतात. त्याप्रमाणे तुम्ही वागावे अशी अपेक्षा असते.
या गीतांमधून एकता, समता, वीरता, शौर्य, बंधुत्व, राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव अशा विविध मूल्यांची आपल्यापुढे मांडणी केलेली असते. हे गुण आपण आत्मसात करावेत व आपले व्यक्तिमत्व देशाचा एक सच्चा नागरिक म्हणून घडवावे हाच त्यामागील उद्देश.
स्वतंत्र भारताचा एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपली जडण-घडण झाली तर ते देशाचे सौभाग्य!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या