या तीन टप्प्यांमध्ये मन खट्टू करू नका


या तीन टप्प्यांमध्ये मन खट्टू करू नका

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/06/2026 :

(१) पहिला टप्पा: ५८ ते ६५ वर्षे

या वयात आपले कार्यक्षेत्र हळूहळू आपल्यापासून दूर जाऊ लागते. आपण आपल्या नोकरीत किंवा व्यवसायात कितीही यशस्वी असलात, कितीही मोठ्या पदावर असलात तरी एक दिवस सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच आपल्याकडे पाहिले जाते.

म्हणून आपल्या जुन्या पदाचा, अधिकाराचा किंवा प्रतिष्ठेचा अति अभिमान बाळगू नका आणि त्यात अडकून राहू नका.

(२) दुसरा टप्पा: ६५ ते ७२ वर्षे

या काळात समाजही आपल्यापासून काहीसा दूर जाऊ लागतो. जुने मित्र, ओळखी कमी होतात. ज्या ठिकाणी आपण काम केले, तिथेही आपली आठवण फारशी काढली जात नाही.

"मी एकेकाळी..." असे वारंवार सांगू नका, कारण आजची पिढी त्याला तितकेसे महत्त्व देत नाही. हे वास्तव स्वीकारा आणि मनाला दुःख करून घेऊ नका.

(३) तिसरा टप्पा: ७२ ते ७७ वर्षे

या टप्प्यात कुटुंबीयही सतत आपल्या जवळ राहू शकत नाहीत. मुले, नातवंडे असली तरी बहुतेक वेळा आपण आपल्या जोडीदारासोबत किंवा एकटेच असतो.

मुलांना वेळ मिळेल तेव्हा ते भेटायला येतात, हेच त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. ते वारंवार येत नाहीत म्हणून दुःखी होऊ नका. ते त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात.

७७ वर्षांनंतर

या वयात जगही हळूहळू आपल्याला विसरू लागते. पण हे दुःख मानू नका. हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकालाच हा प्रवास करावा लागतो.

म्हणून शरीर साथ देत असताना जीवनाचा भरभरून आनंद घ्या. खेळा, फिरा, आवडत्या गोष्टी करा आणि आनंदी राहा.

५८ वर्षांनंतर

मित्रांचा एक चांगला समूह तयार करा.

ठराविक वेळेला आणि ठिकाणी भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्या.

एकमेकांशी नियमित फोनवर बोलत राहा.

आयुष्य आनंदाने जगा.

नेहमी आनंदी राहा!

१. चांगले मित्र आधीपासून जोपासा.

२. इतरांना शक्य तितकी आर्थिक व इतर मदत करा.

३. प्रेमाने बोला, लोकांना आनंदी ठेवा.

४. उत्तम आरोग्य राखा, शक्यतो स्वतःची कामे स्वतः करा.

हे गुण असतील तर मित्र आणि नातेवाईक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील.

म्हणून मनाला दुःख करून घेऊ नका.

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या