" जी. एस. स्पोर्ट्स अकॅडमी अकलूज" च्या वतीने गिरीश प्रभाकर शेटे यांचा सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/06/2026 :
येथील नामांकित "जी. एस. स्पोर्ट्स अकॅडमी अकलूज" च्या वतीने संस्थापक, मार्गदर्शक आणि माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचा त्यांच्या 56 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या ग्रुपमध्ये डॉक्टर, वकील, पोलीस, शिक्षक, उद्योजक, व्यवसायिक, खेळाडू, चार्टर्ड अकाउंटंट, अशा विविध क्षेत्रातील विविध पक्षातील अधिकारी, पदाधिकारी आपले पद विसरून आरोग्य संपदा च्या दृष्टीने मैदानावर एकत्र येऊन दैनंदिन सराव करीत असतात. अकॅडमीचे निर्माते गिरीश शेटे हे स्वतः नॅशनल चॅम्पियन आहेत. या अकॅडमीच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू पोहोचलेले आहेत तर अनेक जण विविध क्षेत्रातील विविध पदावर निवड होऊन यशस्वी पणे कार्यरत आहेत.
अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल समोर मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी सी.ए. शशील गांधी, नवनाथ नागणे, संतोष गुळवे, अमोल बकाल, डॉक्टर स्वप्नील दोशी, सुनील चव्हाण, पांडुरंग सुळ, दिलीप चव्हाण, अमोल वैद्य, किरण जावळे, सुजित बामनकर, मनोज पोटे, कौस्तुभ जावळे, डॉक्टर अनुप गांधी, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, राज्य संपर्क व प्रसिद्ध, प्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे ( संस्थापक संपादक अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



0 टिप्पण्या