मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/06/2026 :
मुहूर्त पाहणे, मुहूर्ताप्रमाणे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे हे आपण सर्वजण करत असतो. आपल्याला पंचांग पाहणे जमत असेल तर आपण स्वतः किंवा ब्राह्मणांकडे जाऊन मुहूर्त पाहतो.
आपण कोणतेही शुभकार्य मुहूर्त पाहूनच करतो. बारसे, मुंज, विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती यासाठी शुभकाळ पाहिला जातो. भले कधी कधी त्या वेळेनुसार कार्य केले जात नाही पण मुहूर्त मात्र पाहिला जातो.
यामध्ये गैर आहे असे म्हणता येणार नाही पण आपला जन्म मुहूर्त पाहून होत नाही तसा मृत्यू सुद्धा मुहूर्तावर नसतो मग जन्म व मृत्यूच्या मधील या प्रसंगांनाच आपण मुहूर्त का पाहतो? चांगली सुरुवात हा चांगला मुहूर्त असू शकतो.
आजचा संकल्प
आपल्याला जे मंगल कार्य करायचे ते योग्य पद्धतीने, चांगल्या मनाने, प्रामाणिकपणे करू व ते सुफळ संपूर्ण व्यवस्थित व्हावे याची काळजी घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या