नाही चिरा नाही पणती एका विस्मरणाचे पुण्यस्मरण

 

नाही चिरा नाही पणती एका विस्मरणाचे पुण्यस्मरण

वृत्त एक सत्ता न्यूज 

संकलक :  आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक : 25/06/2026 : सलग दोन-तीन सुट्टी आल्या. आपण पर्यटनासाठी गोवा निवडतो गोव्याच्या समुद्रकिनारा. रेती, मासे ,नारळ पोफळीच्या बागा मुक्त वातावरण आणि अनेक  xxx गोष्टी यासाठी  गोव्याकडे आपले पाय वळतात गोव्याचे निसर्ग सौंदर्य आपले डोळ्याचे पारणे फेडते तो गोवा या स्वातंत्र सैनिकांच्या मुळे भारतात पोर्तुगीजांना सामील करावा लागला त्या स्वातंत्र्यसैनिकांचे आपण नेहमी उपकृत राहिले पाहिजे .

 *आज 25 जून* 

25 जून  20 19 रोजी पुणे येथे  एका गोवा मुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिकाचे निधन झाले त्यांचे नाव आहे मोहन दामोदर रानडे हे नाव आणि गोव्याचा स्वातंत्र्यलढा झाला हे नवीन पिढीला कदाचित माहित नाही कारण आपण फक्त स्वातंत्र्याची फळे मिळाली आहेत.

 *कोण होते हे मोहन रानडे* 

25 डिसेंबर 1930 साली सांगली येथे जन्मलेल्या मोहन रानडे यांनी सांगली येथे आपले बी कॉम चे शिक्षण व वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी "आझाद गोमांतक दल" नावाची सशस्त्र संघटना उभी केली त्यांचे मूळ नाव मनोहर दामोदर रानडे होते पण क्रांतिकारकांना नावे बदलून राहावे लागते म्हणून त्यांनी मनोहरचे मोहन  असे नाव करून घेतले. सशस्त्र क्रांतिकारकांची संघटना बांधून गोव्यामध्ये सशस्त्र क्रांती घडवून आणायची व गोवा मुक्त करायचा व तो भारतास जोडायचा या दुर्दम्य इच्छेपोटी मोहन रानडे हे गोव्यामध्ये जाऊन भूमीगत क्रांती कार्य करत होते.

 *24 वर्षे शिक्षा* 

1955 साली एका पोलीस स्टेशनवर हल्ला करताना ते जखमी झाले व त्यांना पोलिसांनी पकडले पोर्तुगाल लष्कर न्यायालयाने त्यांना 24 वर्षांची शिक्षा सुनावली व त्यांची रवानगी लिबन्स पोर्तुगाल येथील तुरुंगात केली.

 *गोवा मुक्ती आंदोलन* 

1959 नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजवादी सेवा दल व काँग्रेसचे  सेवा दल अशा अनेक संघटनांनी गोवा मुक्ती आंदोलन चालविले. पुण्याचे ग्राहक पंचायतीचे बिंदू माधव जोशी ,सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके, पत्रकार दि वि गोखले जगन्नाथराव जोशी असे अनेक  संघ स्वयंसेवक या गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेत होते अनेकांना लहान मोठ्या शिक्षा झाल्या लाठ्या अंगावर पडल्या. त्यानंतर मात्र 62 सालीभारत सरकारने लष्करी कारवाई करून  पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोव्याला मुक्त केले. पण 55 साली 24 वर्षे शिक्षा झालेले मोहन रानडे लिबन्स येथील तुरुंगात  खितपत पडले होते.

 *मोहन रानडे विमोचन समिती*

अशी समिती स्थापन करून सुप्रसिद्ध गायक सुधीरजी फडके यांनी मोहन रानडेच्या सुटकेसाठी आकाश पाताळ एक केले अटल बिहारी वाजपेयी यांनी हा मुद्दा संसदेत लावून धरला. अखेर 69 साली या मोहन रानडे यांची पोर्तुगाल  सरकारने सुटका केली. मला आठवत आहे मी त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो मोहन रानडे यांचा सत्कार सांगली येथे स्टेशन चौकात झाला त्या कार्यक्रमास मी प्रेक्षक म्हणून हजर होतो. त्यानंतर मोहन रानडे यांनी आपली कर्मभूमी गोवा निवडली गोव्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्याचा धडाका लावला बालकल्याण व महिला कल्याण यासाठी काम केले दैनिक गोमांतक या वृत्तपत्राची जबाबदारी घेतली या वृत्तपत्रात मोहन रानडे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भक्त असल्याने सावरकरांच्या वर दीर्घ लेखमाला लिहिली पुढे त्यांच्या वृध्दापकाळात त्यांचा मुक्काम पुणे येथे होता. 

25 जून 20 19 दिवशी त्यांचे निधन झाले त्यांच्या अंत्ययात्रेला तत्कालीन गोवा सरकारचे मंत्रिमंडळातील अनेक सदस्य हजर होते भारत सरकारनेही त्याना पद्मश्री प्रदान केली होती. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या तरुण वयातील 14 वर्षाहून अधिक काळ लिबन्स येथील तुरुंगात शिक्षा भोगलेल्या या स्वातंत्र्यवीरास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. नवीन पिढीला व विस्मरण झालेल्या जुन्या पिढीला या स्वातंत्र्यवीराची आठवण राहावी म्हणून हा लेखाचा प्रपंच

ॲड. अनिल रुईकर 

 98 232 55 049 

इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या