मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/06/2026 :

आपल्याला कोणी सदिच्छा देतात किंवा आपण कोणाला सदिच्छा देतो तेंव्हा, सुखी हो, आनंदी हो, सुख, शांतता, समाधान लाभो, यशस्वी हो वगैरे शुभेच्छा देतो.

या शुभेच्छा देण्याने ती व्यक्ती सुखी किंवा समाधानी होत नाही, यशस्वी होत नाही तर त्यासाठी स्वतःला खास शारीरिक व मानसिक  स्थिती निर्माण करावी लागते. त्या आशीर्वादातून आपल्याला केवळ प्रेरणा मिळते.

इतरांना चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करतो तेंव्हा नकळत आपल्या पण भावना सकारात्मक होतात. मनात तसेच विचार येतात व आपणही भावनांच्या त्या प्रवाहात स्वतःला घेऊन जातो.

आजचा संकल्प

दुसऱ्याचे भले चिंतल्याने आपले पण भले होते हे शंभर टक्के खरे आहे. याचे आपण अनुभवातून सत्य अनुभवू व सदिच्छांची देवाण-घेवाण करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या