सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/06/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा  करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.  शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी योगाचे फायदे  सर्वांपर्यंत पोहोचवणे, निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे आणि भारताच्या प्राचीन परंपरेचे महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित करणे या उद्देशाने योग संगम दिनाचे  आयोजन केलेले होते . त्यामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

या योग कार्यशाळेमध्ये योगा अभ्यासक बाळासाहेब चव्हाण  यांचे मार्गदर्शन लाभले. सदर योग कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून  महाविद्यालय समन्वयक पोपट भोसले-पाटील  व प्रा.भारती चंदनकर यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या