मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/06/2026 :
जीवनात शारीरिक आरोग्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच मानसिक आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असते.
परंतु, सध्या आहाराविषयी समाजात वेगवेगळे मार्गदर्शन आणि सल्ले सातत्याने मिळत असतात. दोन जेवणांच्या मध्ये किती अंतर असावे? जेवण नक्की काय असावे? किती खावे? आणि कसे खावे? याविषयी इतके सल्ले मिळतात की, नेमके कोणाचे ऐकावे, हेच समजत नाही.
खरे तर, आपल्या शरीराला जे मानवते आणि आपल्या दैनंदिन जीवनात जे सहज शक्य होते, त्याप्रमाणे आपण स्वतःचा आहार, जेवणाच्या वेळा आणि प्रमाण ठरवावे. दुसऱ्याला जे मानवेल, ते आपल्याला मानवेलच असे नसते. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे त्यांनी त्या वेळा व प्रमाण ठरवणे कधीही अधिक योग्य.
आजचा संकल्प
आपण जो आहार घेऊ, तो जर पूर्ण आनंदाने आणि समाधानाने घेतला, तर अगदी साधी भाजी-भाकरी सुद्धा शरीराला उत्तम मानवते, हे आपण लक्षात घेऊया. अशा प्रकारे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या