भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या आंदोलनकारांच्या गुप्त खाबरा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/06/2026 :

1975 ला इंदिरा गांधी ने भारतीय संविधानाच्या आर्टिकल 352 नुसार आणीबाणी लावली म्हणून देश वाचला. अमेरिकन  गुप्तहेर संस्था सीआयए साठी काम करणारे संघोटे आणि त्यांच्या बगलबच्च्यानी देशामध्ये आरजकता माजवली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघोटी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कुठेही सहभागी नव्हते. ते चक्क भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या आंदोलनकारांच्या गुप्त खाबरा ब्रिटिशांना देत होते. असे स्वातंत्र्यवैरी संघोटे सहित जयप्रकाश नारायण ,मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या इंदिरा गांधी विरुद्ध आंदोलन उभारले, त्या आंदोलनाला पैसा अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने पुरवला.

आणीबाणी या देशात 1975 च्या अगोदर या देशात दोन वेळेस लावल्या गेली. 1962 च्या युद्धात आणि 1971 च्या पाकिस्तान युद्धात आणीबाणी लावल्या गेली होती. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यावर संविधान मध्ये आणीबाणी लावण्याचे आर्टिकल 352 कलमाची तरतूद आहे. 

श्रीमती इंदिरा गांधींनी 1975 ला लावलेली आणिबाणी देशाच्या संविधानानुसार होती. ती आणीबाणी लावण्याचे वेळ विरोधकांनी त्यांच्यावर आणली होती तर इंदिरा गांधी विरुद्ध आंदोलन निर्माण होण्यासाठी लागणारा पैसा हा अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA ने पुरवला होता. विरोधकाचे इंदिरा हटाव आंदोलनच अमेरिकेच्या पैशावर होते. 

इंदिरा गांधी यांनी 1971 चे बांगलादेश युद्ध जिंकून पाकिस्तान बरोबर अमेरिकेलाही हरवले होते. अमेरिकेच्या अध्यक्ष रिचर्ड नेक्सन पाकिस्तानची बाजू घेत, अमेरिकन नौदलाच्या सातवा बेड्या पाठवू अशी भारताला धमकी दिल्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या सातवाच काय आठवा पाठवा आम्ही बांगला देशाला पाठिंबा देणार आणि इंदिरा गांधी बांगलादेश आणि पाकिस्तान युद्धात बांगलादेशाची बाजू घेऊन बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आणून जगाला दाखवले. इंदिरा गांधी ने बांगला युद्धात  अमेरिकेला हार मानायला भाग पाडतो.

8 मे 1974 ला पोखरण मध्ये अणुस्फोट करून भारत आणु संपन्न राष्ट्र आहे हे जगाला दाखवून दिले. जे अमेरिकेला सहन होणारे नव्हते.

इंदिरा गांधी ने भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करून बँका गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दारात घेऊन गेल्या. ज्यामुळे भारताची ग्रामीण व शहरी अर्थकारण सुधारून भारतीय अर्थव्यवस्था भक्कम होऊ लागली. श्रीमती इंदिरा गांधी यांची लोकप्रियता आणि भारतातील आर्थिक सुधारणा अमेरिका सारख्या राष्ट्राला सहन होणाऱ्या नव्हत्या.

गुजरात मध्ये विद्यार्थ्यांच्या (मेसची) खानावळीची फीस वाढवली इंदिरा विरोधकांनी त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेतला. इंदिरा कट्टर विरोधक मोरारजी देसाई अहमदाबाद येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना म्हणू लागले, तुम्ही विधानसभेचा घेराव घाला संसदेचा घेराव घाला. गुजरात मधील विद्यार्थ्यांच्या खानावळीची फीस हा राष्ट्रीय प्रश्न नव्हता फक्त इंदिरा गांधी विरुद्ध असंतोष निर्माण करणे हाच विरोधकांचा मुख्य प्रश्न होता. त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नव्हतं. 

जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा संप पुकारला आठ मे 1974 ते 27 मे 1974 भारतातील संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प केल्या गेली. रेल्वे वाहतूक ठप्प मुळे जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास झाले महागाई वाढणे साहजिक आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्या आंदोलनात रेल्वे संबंधित कुठलेच प्रश्न नव्हते. रेल्वे आंदोलनाचा मुख्य उद्देश इंदिरा हटाव हा होता.

एकेक काळी नेहरूंचे सहकारी इंदिरा गांधींना मुलगी सन्मान मानणारे स्वातंत्र्यानंतर कुठल्याच आंदोलनात सहभागी नसलेले जयप्रकाश नारायण यांनीही इंदिरा गांधींची लोकप्रियता सहन झाली नाही. इंदिरा गांधी यांना सत्तेतून हटवण्याच्या हट्टला पेटलेले जयप्रकाश नारायण यांनी 15 फेब्रुवारी 1975 ला दिल्लीच्या रामलीला मैदानावरून  भारतीय लष्कराला आणि पोलिसांना सरकार विरुद्ध करण्याचे आव्हान करतात ज्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

इंदिरा गांधी यांनी कायद्याचा आधार घेत 25 जून 1975 देशात आणीबाणी जाहीर केली. इंदिरा गांधी आणीबाणी जाहीर करत नाही तर देशात आराजता निर्माण होण्याचे वातावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इंदिराविरोधक यांनी निर्माण केले होते. देशात फुटीरतावादी शक्ती पंजाब आसाम मध्ये डोकं वर काढू लागल्या. इंदिरा गांधी आणीबाणी जाहीर करीत नाही तर देश वेगळ्या मार्गाला गेला असता आणीबाणी मुळे च आपला देश वाचला गेला तो केवळ इंदिरा गांधींच्या दूरदृष्टीपणामुळेच. 

इंदिरा गांधीची लोकप्रियता ज्याप्रमाणे भारतीय इंदिरा गांधींच्या विरोधकांनाच खूपत होती त्यांनी आपल्या देशातील सरकारच्या विरोधात इंदिरा गांधीच सरकार ही परदेशी सरकार आहे या पद्धतीने आंदोलन उभे केले ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला. 

इंदिरा विरोधक जयप्रकाश नारायण मोरारजीभाई देसाई अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस यांनी इंदिरा हटाव साठी उभे केलेल्या आंदोलनाला अमेरिकेने पैसा पुरवलेला होता.

अमेरिकन लेखकाचे पुस्तक आहे पाईस ऑफ पावर या पुस्तकात लेखकाने म्हटले आहे की मोरारजी देसाई आणि त्यांचे आंदोलन अमेरिकन सीआयए (CIA)साठी काम करत होते.

 आणीबाणी नंतर इंदिरा गांधी निवडणूक हरल्या आणि सत्तेत मोरारजी देसाई आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले परंतु त्यांना सरकार टिकवता आले नाही अंतर्गत बंडाळीने सरकार पडले.लोकांच्या चूक लक्षात आली भारतीय जनतेने पुन्हा इंदिरा गांधींना सत्तेवर बसवले.

भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे नाव अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचा एजंट म्हणून येते त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधानांचे नाव सीआयडी म्हणून येते भारताची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी सदरील पुस्तकावर बंदी आणली. 

तरुण बांधवांना कळकळीची विनंती ,मित्रहो नागपूर रेशीम बाग व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोट्या इतिहासाच्या आहारी जाऊ नका.सत्य घटना, सत्य इतिहास समजून घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची पिल्लावळ तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल असा खोटा इतिहास सांगून सत्ता हस्तगत करत आहेत. 

जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस.

हरिभाऊ सोळंके 

सादोळा ता माजलगाव जी बीड

जय हिंद🇮🇳

====================≈

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या