राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/06/2026 : येथून प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिक अकलूज वैभव (वर्ष 40 वे)आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता (वर्ष 29 वे) च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त, आंबेडकर नगर अकलूज येथील वृत्त एकसताचे कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका व महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, वृत्त एकसत्ताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड, सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड, शुभम विकास सोंडे, सौ.वैष्णवी शुभम सोंडे, सम्यक विचार मंच चे अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या