आनंदी विचार ✍️ HAPPY THOUGHTS
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/05/2026 :
अनेक चांगले मेसेज पाठवूनही रिप्लाय न मिळाल्याने, अर्जुनाने वैतागुन जेंव्हा मोबाईल खाली ठेवला. तेंव्हा श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये समजावली,
ज्यांना तु आवडतोस, ते न वाचताही तुझ्या मेसेजला रिप्लाय देतात. कारण ते तुझे मित्र असतात,
काहींना तुझे मेसेज आवडतात, पण पद, प्रतिष्ठा व लोकं काय म्हणतील, याचा विचार करून ते रिप्लाय करीत नाहीत, कारण ते चतुर असतात,
ज्यांना तु आवडत नाहीस त्यांना तुझा मेसेज कितीही आवडला तरी ते कधीच रिप्लाय करणार नाहीत. कारण ते तुझे विरोधक असतात,
म्हणून हे पार्था..
तु मोबाईल उचलत रहा !
तु लिहीत रहा !!
तु पाठवत रहा !!!
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"‼️
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
संकलन : प्रविण सरवदे, कराड.

0 टिप्पण्या