🟠 अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्री संत नामदेव गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/05/2026 :
पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्वकाळावर श्रीक्षेत्र पंढरपूर (भक्तीधाम 65 एकर चंद्रभागे शेजारी) येथे रविवार दिनांक 17 मे 2026 ते रविवार दिनांक 24 मे 2026 या कालावधीत भव्य दिव्य स्वरूपात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर (श्री गुरु देहूकर महाराज फड, मालक श्रीक्षेत्र पंढरपूर) यांनी "अकलूज वैभव" व "वृत्त एकसत्ता" चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना सांगितली. त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या स्वतःसह स्वागताध्यक्ष शांती ब्रह्म गुरुवर्य हभप श्री मारोती बाबा कुरेकर, स्वागताध्यक्ष श्रीगुरु ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, स्वागताध्यक्ष ह भ प गुरुवर्य माणिक महाराज मोरे (श्री क्षेत्र देहू संस्थान) असे चौघेजण या हरिनाम सप्ताहाचे स्वागताध्यक्ष आहेत. स्वागताध्यक्ष ह भ प श्री श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर हे सोमवार दिनांक 11 मे रोजी कोळेगाव येथे कै. निवृत्ती नामदेव दुपडे यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त फुलाचे किर्तन सेवेसाठी आले असता व्यासपीठावर अखंड हरिनाम सप्ताहाची कार्यक्रम पत्रिका वृत्त प्रसिद्धी करिता पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना देत असताना ते बोलत होते.
ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिका स्वीकारताना व्यासपीठावर कोळेगाव येथील सुप्रसिद्ध त्रिवेणी संगम देवस्थानचे सर्वेसर्वा ह.भ.प. दत्तात्रय महाराज दुपडे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, ह.भ.प. माऊली महाराज हेटकळे, दिपक महाराज दुपडे यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
श्रीक्षेत्र पंढरपूर, माढा, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व समस्त सोलापूर जिल्हा व इंदापूर, बारामती, आटपाडी, फलटण इत्यादी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर आयोजकांच्या वतीने आयोजित केलेला हा अपूर्व असा सोहळा होईल.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज 750 वा जन्मोत्सव सोहळा, संत नामदेव महाराज, संत जनाबाई व आदी 14 संतांचा 675 समाधी सोहळा, श्री संत सावता महाराज 775 वा जन्मोत्सव सोहळा, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा, श्री संत जनार्दन पंत देशपांडे देवगिरी 450 वा समाधी सोहळा, श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर 375 वा जन्मोत्सव सोहळा आधी करून संत महात्म्यांच्या उत्सवाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रतिदिन 11000 गाथावाचक, प्रतिदिन 1000 टाळकरी, प्रतिदिन 25 मृदुंग वादक, 24 तास अखंड भजन प्रहरा,
🟢 शनिवार दिनांक 16/5/ 2026 रोजी दुपारी 3 ते 5 वाजता श्रीक्षेत्र पंढरपुरास क्षेत्र प्रदक्षिणा व भव्य दिव्य मिरवणूक होणार आहे.
🔵 दिंडी वैशिष्ट्ये : ३७५ धर्म ध्वजधारी, 375 कलशधारी, 375 तुलसीधारी, 375 कीर्तनकार, 375 टाळकरी, 375 मृदुंग सेवक, 375 ब्रह्म विनाधारी, 375 चोपदार, ३७५ तुकाराम नावाच्या व्यक्ती, 750 ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती, 675 नामदेव नावाच्या व्यक्ती, ६७५ जनाबाई नावाच्या महिला.
🟣 दैनंदिन कार्यक्रम: दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 6 ते 11 श्री नामदेव गाथा पारायण, सकाळी ११ ते १२:३० कीर्तन, दुपारी 1 ते 3 भोजन व वारकरी नित्यनेमांचे भजन, दुपारी 3 ते 3:30 हरिपाठ, दुपारी 3: 30 ते 5 : 30 श्री नामदेव महाराज जीवन चरित्र कथा, सायंकाळी 6 ते 8 किर्तन, रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत भोजन व नंतर हरिजागर.
🟡 श्रीक्षेत्र पंढरपूर वर व भव्य दिव्य दिंडी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी. हेलिकॉप्टर सौजन्य श्री गोसेवक संजय बापू वालवडकर, वालेवाडी, पुणे.
🟡 प्रवचन सेवा शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजता ह भ प श्री गुरु राणा महाराज वासकर (श्री शेत्र पंढरपूर श्री गुरु वासकर महाराज फड मालक)

0 टिप्पण्या