आनंदी विचार...............✍️

 

आनंदी विचार...............✍️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/05/2026 :

माणसाची प्रगती इतकी प्रचंड झाली आहे की हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसतो. त्याच्या हालचाली वर नियंत्रण ठेवता येते. त्याचा आवाज ही ऐकता येतो. पण अधोगतीही इतकी खोलवर झालेली आहे की शेजारी बसलेल्या माणसाच्या डोळ्यातील वेदना ही दिसेनाशा झाल्या आहेत.

तंत्रज्ञानाने अंतर मिटवले, पण संवेदनशीलतेने माणसं दूर नेली. आत्ता वेळ आलेली आहे पुन्हा माणूस माणसाजवळ आणण्याची, माणुसकी जपाण्याची.

सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षाही अनुभवाची फक्त एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजुतदार बनवते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय नि:स्वार्थी माणसाची किंमत समजत नाही.

प्रसंगी साथ देणारी माणसे विकत घेता येत नाही, तर ती सन्मानाने कमवावी लागतात.

बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोप असत. जगायला गेलं तर दु:खातही सुख असतं. चालायला गेलं तर निखारेही फूले होतात. तोंड देता आले तर संकट ही क्षुल्लक असतं. वाटायला गेलं तर अश्रूंत ही समाधान असतं. पचवायला गेलं तर अपयश ही सोपं असतं. हसायला गेल तर रडणेही आपल असतं. बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं.

आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा. गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावेपर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे.

समाजात एक विशिष्ट उंची गाठेप्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोडवते.

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

      देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या