मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/05/2026 :
पूर्वी म्हणत असत, 'अंथरूण पाहून पाय पसरावेत'. म्हणजेच आपली ऐपत पाहून किंवा झेपेल इतकाच खर्च करावा; कोणाची बरोबरी नको की कोणाशी स्पर्धा नको.
सध्या मात्र मानसिकता थोडी बदलली आहे. आता पाय पसरून उरेल, असे अंथरुणच वाढवले जाते; म्हणजेच 'ऋण काढून सण' साजरा केला जातो. फोन करून तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्था आहेत, क्रेडिट कार्ड्स आहेत; त्यामुळे कोणत्याही खरेदीला अडचण येत नाही.
बंगला, गाड्या, महागडे फोन्स, दागिने, कपडे; कशाचीच हयगय नाही. पर्यटन, परदेश दौरे; या सगळ्यात उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नाही. कर्जाचा बोजा डोईजड झाला की प्रचंड मानसिक ताण येतो. कर्जाचे हप्ते आणि ऐशारामाची जीवनशैली यांचा ताळमेळ बसत नाही.
आजचा संकल्प
उत्पन्नाचा विचार करून, भविष्याची तरतूद करून आणि योग्य गुंतवणूक करून, आपल्याला झेपेल अशाच पद्धतीने आपली जीवनशैली ठरवू. योग्य आर्थिक नियोजन करू आणि ताणविरहित जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
=====================

0 टिप्पण्या