गारपीट उन्हाळ्याच्या.. सुरवातीला का होते ?

 

गारपीट उन्हाळ्याच्या..

 सुरवातीला का होते ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/05/2026 :

गारपीट (Hailstorm) होणं हे काही नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते. मार्च आणि एप्रिल महिन्यात हे घडणं म्हणजे विशेष आहे. त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. गारा पडण्याचे दोन कारणे आहेत; 

१) हवा जास्त उंची पर्यंत जायला हवी, २) हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते. 

बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वे कडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधी कधी अरबी समुद्रावरून येणारे वारे येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. हे वारे मार्च एप्रिल महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडे सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रा पर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंची पर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते. 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या