मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/05/2026 :

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तरी पण समाजात वावरायला सर्वांनाच आवडते असे नाही. काहीजण अगदी एकटे राहणे, कमी बोलणे पसंत करतात.

तर काही लोकांना आपल्या सभोवताली  भरपूर नातलग, मित्रपरिवार असावा असे वाटते. ते नेहमी गर्दीत असतात. भरपूर व्यक्त होतात, इतरांनाही समजून घेतात. क्वचित प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करतात पण इतरांना उपयोगी पडतात.

या दोन्हीचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. अगदीच एकलकोंडे नको तसे स्वतःकडे दुर्लक्ष पण नको. प्रत्येकाला आपल्या व्यायामाच्या, जेवणाच्या व विश्रांतीच्या वेळा सांभाळता आल्या पाहिजेत.

आजचा संकल्प

आपले कुटुंब, नातलग व मित्र परिवार सांभाळत असताना स्वतःच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याचा विचार करू व स्वतःला पण वेळ देऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या