शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा १२ वी चा निकाल ९१.९५ टक्के

 

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा  १२ वी चा निकाल ९१.९५ टक्के

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/05/2026 : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी, मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेचा  निकाल ९१.९५ टक्के लागला. संस्थेच्या सात शाखेतून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम यातून एकूण १५९१ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी १४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

             संस्थेत सदाशिवराव माने विद्यालयातील विज्ञान शाखेचा चि. अरबाज नजिर बागवान यांने ६०० पैकी ५६३ गुण व ९३.८३ टक्के मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला. तर वाणिज्य शाखेची कु. अपूर्वा सचिन राऊत हिने ६०० पैकी ५५१ गुण व ९१.८३ टक्के मिळवित       द्वितीय क्रमांक आणि विज्ञान शाखेची कु. आफरीन मुबीन मोकाशी  हिने ६०० पैकी ५४९ गुण व ९१.५० टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.

कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात कु. सानिका संतोष थोरात हिने १०० पैकी १०० गुण मिळवले.

        संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथील विज्ञान, कला, वाणिज्य व व्य.अभ्यासक्रम या शाखेतून ६१३ विद्यार्थी परीक्षेला बसले यापैकी ५९९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल ९७.७२ टक्के लागला.

  महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथील विज्ञान, कला,  व्य. अभ्यासक्रमातून २३१  विद्यार्थी पैकी २२५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल  ९७.४० टक्के लागला.

      शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथील विज्ञान, कला, वाणिज्य, व्य. अभ्यासक्रमातील ३८० विद्यार्थी पैकी ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल ८६.८४ टक्के लागला.

         कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यू. कॉलेज सदाशिवनगर मधील विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतून १५३ पैकी १४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल ९४.७७ टक्के लागला.

      जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथील विज्ञान शाखेतील ११४ पैकी ११४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.

          सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर येथील कला विभागात ७६ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ५१.३२ टक्के लागला.

             श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय व ज्यु. कॉलेज नातेपुते येथील कला शाखेतून २४ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ४५.८३ टक्के लागला.

           या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक मंडळ, विविध शाखेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या