अपरा एकादशी निमित्त आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी व श्री ज्ञानेश्वरी मंदिर देवदर्शन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/05/2026 :
अपरा एकादशी निमित्त आळंदी (देवाची) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थळ आणि श्री ज्ञानेश्वरी मंदिरात जाऊन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सौ. स्मिता गिरीश शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे यांनी दर्शनाचा लाभ घेतला.
अती भव्य अशा ज्ञानेश्वरी मंदिरातील प्रत्येक मजल्यावरील भिंतींवर ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे केलेले नेत्रदिपक कोरीव काम पाहून सर्व भाविक प्रभावित झाल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


0 टिप्पण्या