मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/05/2026 :
दैनंदिन जीवनात अनेकदा काहीतरी मनाला लागणारे, मनाला वेदना देणारे प्रसंग येतात; तेव्हा खूप वाईट वाटते. काही दुःखद प्रसंग, अपयश किंवा केवळ गैरसमज झाल्याने आपण कोणाकडून दुखावले गेलो, तर त्याचा त्रास जास्त होतो.
अशा वेळी कोणाजवळ तरी मन मोकळे करावेसे वाटते. कोणीतरी पाठीवरून, डोक्यावरून आधाराचा हात फिरवावा आणि "मी आहे ना, कशाला काळजी करतोस?" असे म्हणावे, असे आपल्याला आतून वाटत असते.
आपल्या भावना समजून घेणारे नातलग किंवा मित्र-मैत्रिणी अशा वेळी खूप उपयोगी पडतात. "सगळे ठीक होईल" असा विश्वास ते आपल्याला देतात. त्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शातून आणि उपस्थितीतून मिळालेला दिलासा आपल्याला खऱ्या अर्थाने आधार देतो आणि सावरतो.
आजचा संकल्प
सुख-दुःखाच्या प्रसंगी आपल्या भावना समजून घेणारे खरे मित्र किंवा नातलग यांची प्रत्यक्ष उपस्थिती किती महत्त्वाची असते, हे आपण लक्षात घेऊया. आजपासून 'ऑनलाईन' मित्रांच्या आभासी दुनियेपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या खऱ्या मित्रांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या