विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/05/2026 : आपल्याला शाळेत अनेक मित्र असतात. काही जण तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे नावे ठेवतात; तर काही जण मनापासून कौतुक करतात आणि आपली काही कमतरता असेल किंवा आपण चुकत असू, तर ते देखील तोंडावरच स्पष्टपणे सांगतात.

खरे तर, कौतुक जितके आपण मनापासून ऐकतो, तितक्याच खेळकर मनाने आपल्याला 'टीका' देखील पचवता आली पाहिजे. किंबहुना, टिकेकडे सकारात्मक नजरेने पाहून स्वतःमध्ये योग्य ती सुधारणा करता आली पाहिजे.

मुलांनो, कोणी कौतुक केले तरी ते फारसे डोक्यात घेऊ नका, त्याने हुरळून जाऊ नका; आणि कोणी नावे ठेवल्यास खचूनही जाऊ नका. उलट, आपल्यातील त्रुटी समजल्यावर त्यामध्ये वेळीच सुधारणा होणे अत्यंत महत्त्वाचे असते.

आपल्या चुका दुरुस्त करा आणि स्वतःला उत्तम प्रकारे घडवा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या