विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/05/2026 :
सुट्टीत तुम्हाला प्रवासाला जाण्याचा योग येईलच. प्रवास बस, आगगाडी किंवा स्वतःच्या गाडीने; कोणत्याही वाहनाने केला तरी दोन गोष्टींची पथ्ये नक्की पाळायची.
प्रवासात झोपायचे नाही आणि मोबाईलमध्ये डोके घालून बसायचे नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किंवा समोर खिडकीतून जे दृश्य दिसेल, ते पाहायचे. शेते असतील, झाडे असतील, इमारती असतील किंवा माळराने व डोंगर असतील.
मुलांनो, आपल्या देशाचा भूगोल पाहण्याची संधी दवडू नका. त्या त्या भागातील, त्या त्या हंगामातील (सीझनमधील) पिके पाहा. निसर्ग पाहा. माणसांनी केलेली प्रगती पाहा. प्रवासात त्या मार्गावर येणाऱ्या गावांची नावेही आवर्जून लक्षात ठेवा.
उघड्या डोळ्यांनी प्रवास करा आणि अनेक गोष्टी समजून घ्या.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या