आनंदी विचार


आनंदी विचार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/05/2026 : आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल.

सुंदर गुलाबालाही काट्यांवर उभे रहावे लागते. कमळाला चिखलात उभे रहावे लागते. पण तरीही ते जराही स्वतःस काटा किंवा चिखल लागु देत नाहीत. कोमल भावनेने खुलतात, सुगंध देतात. तसेच आपल्या जीवनाचे आहे, दररोजच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास, मनस्ताप होतो. पण आपण मन शांत संयमी ठेवले, तर आपलेही आयुष्य सुंदर फुलांसारखे नक्कीच सुगंधी व आनंदी होते,

स्वतःची किंमत ओळखा आणि एक लक्षात ठेवा, जर एखाद्या व्यक्तीला तुमची किंमत समजत नसेल तर स्वतःची किंमत कमी करून त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमची ओळख इतरांच्या शब्दांवर नाही तर तुमच्या स्वभावावर, स्वाभिमानावर आणि तुमच्या वाणीवर ठरते. जे लोक खरंच तुमचे असतात, ते तुमच्यातील चांगुलपणा ओळखतात, तुमचा आदर करतात आणि तुमच्यासोबत उभे राहतात. आणि जे वारंवार दुर्लक्ष करतात, ते तुमच्या आयुष्यात फक्त एक धडा असतात, कायमचा भाग नाहीत,

संवाद शब्दांपेक्षा खोल जाऊन माणसातील ज्ञान उलगडून दाखवतात. ठेच लागली की कळते, आपले लक्ष स्वप्नांवर होते की वास्तवावर.

डोळे काही बोलत नाहीत, पण आयुष्यभराची गोष्ट सांगून जातात.

स्पर्श क्षणाचा असतो, पण मनावर उमटलेली खूण कायमची ठेवून जातो. आणि वेळ ती कुणाची बाजू घेत नाही, फक्त माणसं आणि जग दोन्ही उघडे पाडते. शांती तेंव्हा सुरू होते, जेव्हा अपेक्षा संपतात.  मन तेंव्हाच हलकं वाटतं, जेव्हा तुलना थांबतात. आणि आनंद तेंव्हाच सापडतो, जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो. संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करीत असतो.

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

 देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)   

   ✒️संकलन : प्रविण सरवदे प्रविण कृषी अधिकारी


=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या