तिकोटे 卐 काझी शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/05/2026 :
मोहम्मद इब्राहिम टिकोटे यांची नात आणि चांद मोहम्मद तिकोटे राहणार शिवतेजनगर, यशवंतनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, यांची मुलगी नुरूनिसा आणि हजरत दस्तगीर महामुद काझी यांचा नातू व हजरत दस्तगीर काझी राहणार महादेवनगर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचा मुलगा हमीदसाहेब यांचा शुभविवाह अत्यंत थाटाने संपन्न झाला.
रविवार दिनांक 24/ 5 /2026 रोजी सकाळी 11 : 25 वाजता अन्नपूर्णा मंगल कार्यालय, धवलनगर रोड, शिवतेजनगर, अकलूज या ठिकाणी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी दोन्ही परिवाराकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे तिकोटे आणि काझी परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे , ॲड. शरफु मल्लिक शेख (नोटरी भारत सरकार) , लालू शेख, सुभाष लवटे (सर) इत्यादी उपस्थित होते.

0 टिप्पण्या