मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/05/2026 :
काही माणसे फक्त स्वतःपुरतीच जगत असतात. सदैव स्वतःचाच विचार, स्वतःचीच फुशारकी आणि स्वतःचाच स्वार्थ यात ती मग्न असतात. त्यांच्या विचारांत कुटुंबातील सदस्यांनाही स्थान नसते.
अशी माणसे स्वतःला खूप शहाणे समजतात आणि सतत इतरांच्या चुका शोधण्यात व त्या दाखवण्यात धन्यता मानतात. आपण कितीही चुकीचे वागत असलो, तरी ते मान्य करण्याची वृत्ती त्यांच्याकडे नसते.
अशा व्यक्तींनी कर्माची फळे भोगण्यासाठी तयार राहायला हवे. कारण 'मीपणा' हा शेवटपर्यंत टिकत नाही. आयुष्यात कधीतरी असे अनुभव येतात, की आपण चुकलो आहोत हे लक्षात येते; पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. शेवटी कर्माचा हिशेब होतोच आणि तो भोगल्याशिवाय सुटका नसते.
आजचा संकल्प
चारचौघांत वावरताना अहंपणा किंवा 'मीपणा' न मिरवता, हे दुर्गुण आहेत हे वेळीच लक्षात घेऊया. क्षणिक आनंद मिळवण्याच्या मोहात न पडता, नम्रतेने वागूया आणि आत्मिक समाधान मिळवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप
=====================

0 टिप्पण्या