मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/05/2026 :
सध्या 'पालक' ही भूमिका निभावणे खूप अवघड झाले आहे. प्रत्येकाला एक किंवा दोनच मुले असतात; त्यामुळे त्यांचे लाड आणि कौतुक भरपूर होते. कौतुकापोटी त्यांच्यासाठी सर्व काही करणे, प्रत्येक गोष्ट आयती त्यांच्या हातात देणे आणि जे आपल्याला बालपणात मिळाले नाही, ते सर्व मुलांना देण्याची पालकांची धडपड असते.
परंतु, त्याचा परिणाम असा होतो की, "ही सर्व आई-बाबांचीच कामे आहेत आणि त्यांनीच ती करायला हवीत," अशी मुलांची मानसिकता होते. अगदी त्यांना हवी असलेली वस्तू त्यांना स्वतःच्या हाताने घ्यायला लावली, तरीही त्यांना तो स्वतःवर झालेला अन्याय वाटू लागतो.
त्यासाठी मुलांना (एक असो वा दोन) स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर हळूहळू आई-बाबांच्या कामात मदत करणे, घरातील लहान-मोठ्यांची काळजी घेणे, अशा गोष्टी त्यांना करायला लावल्या पाहिजेत.
आजचा संकल्प
आपल्या मुलांना योग्य वयात योग्य वळण लावलेच पाहिजे. अति लाड न करता त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊया आणि पालक या नात्याने त्यांना एक सुजाण नागरिक बनवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या