मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/05/2026 :
सध्या आपल्या सर्वांचेच राहणीमान सुधारले आहे. पूर्वी आपण कसे राहत होतो आणि आता कसे राहतो, याचे तुलनात्मक निरीक्षण केले तर नक्कीच बदल जाणवेल.
पूर्वी आपली घरे साधी होती, वाहने तर नव्हतीच. कपडे साधे आणि जेवणात भाजी-भाकरी असायची. फिरण्यासाठी सायकल असायची; आता मात्र सर्वच बदलले आहे. पैसा आला, सुविधा वाढल्या, कमाई वाढली आणि त्यासोबत खर्चही वाढला.
खरे तर कमाई वाढली म्हणून खर्च वाढलाच पाहिजे असे नाही. खर्च बेताने करून बचत वाढवली पाहिजे. गरजा भागण्याइतपत खर्च करणे आपल्याला जमले पाहिजे. उधळपट्टी न करता काटकसर करता आली पाहिजे; जेणेकरून भविष्यात काही अडचण आली, तर आपल्याकडे आर्थिक नियोजन असेल.
आजचा संकल्प
कमाई वाढली म्हणून चैन करण्यापेक्षा बचत करूया. पैशाचा योग्य विनियोग करूया. भविष्याची तरतूद करू, गरजूंना मदत करू आणि माणुसकी जपूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.
=====================

0 टिप्पण्या