वाघमोडे - पाटील 卐 मासाळ शुभविवाह संपन्न

 

वाघमोडे - पाटील 卐 मासाळ शुभविवाह संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 09/05/2026 :

श्री विठ्ठल आबा वाघमोडे - पाटील यांची नात व सौ वंदना व श्री मोहन विठ्ठल वाघमोडे - पाटील राहणार बांगर्डे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. प्रियदर्शनी आणि कै. आनंदराव नारायण मासाळ यांचे नातू व सौ सुमन व श्री सतीश आनंदराव मासळ राहणार ढेकळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचे चिरंजीव गणेश यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वा. 42 मिनिट या गोरज मुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला.

राज आनंद मंगल कार्यालय नातेपुते - दहेगाव रोड, नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उभयपक्षाकडील सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी वधू पिता मोहन विठ्ठल वाघमोडे - पाटील (संचालक, रामहरी रुपनवर पतसंस्था नातेपुते) यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान वाघमोडे - पाटील आणि  मासाळ परिवाराच्यावतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या