विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 08/05/2026 :

कोणत्याही गोष्टीची सुरुवात केल्याशिवाय आपण ती गोष्ट पूर्णत्वाकडे नेऊ शकत नाही. सुरुवात करणे सर्वात महत्त्वाचे असते. बाराखडीने सुरुवात झाली, की मगच उत्तम लेखन-वाचन करता येते.

पण अनेकदा सुरुवात कधी करायची, यासाठी 'मुहूर्त' पाहिला जातो. मुहूर्त पाहून सुरुवात केली की कार्याला यश येते, असे मानले जाते. पण नुसताच मुहूर्त उपयोगी नसतो, तर जिद्दीने कार्य करावे लागते.

मुलांनो, योग्य सुरुवात, सातत्य, काम पूर्णत्वास नेण्याची महत्त्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी आणि बारकाईने केलेला अभ्यास यांमुळेच यश मिळते आणि कार्य सिद्धीस जाते.

मनापासून सुरुवात करा आणि यशस्वी व्हा!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या