विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/05/2026 :

सध्या युवकांमध्ये सेल्फी, रील्स, व्हिडिओज काढणे आणि ते सोशल मीडियावर टाकणे, याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त अवघड परिस्थिती निर्माण करून शूटिंग केले जाते.

मागच्या एका चाकावर दुचाकी चालवणे, गाड्या वेडीवाकडी चालवणे, अशा प्रकारांमुळे जीवघेणे अपघात होतात. मुलांनो, क्वचित अशा प्रसंगांत रस्त्यावरून जाताना इतरांना पण इजा होते.

आपले आई-वडील घरी आपली वाट पाहत असतात. आपण त्यांचे भविष्य आहोत, त्यांच्या म्हातारपणाची काठी आहोत. अशा परिस्थितीत आपण असे उद्योग करणे किती योग्य आहे?

अनुकरण कोणाचे करावे? कशाचे करावे? याचे भान ठेवा. जीवन सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या