"नेते गेले, मात्र सुज्ञ मतदार काँग्रेस बरोबरच राहिले" - लहू अण्णा निवंगुने
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/05/2026 : इंदापूर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते वैयक्तिक स्वार्थामुळे, परिस्थितीजन्य वैयक्तिक अडचणीमुळे काँग्रेस सोडून गेले मात्र सुज्ञ मतदार काँग्रेस बरोबरच राहिला आहे असे ठाम मत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लहू अण्णा निवंगुने यांनी व्यक्त केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटना सृजन अभियान अंतर्गत नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटी साठी इंदापूरातील शासकीय विश्रामगृहात आलेले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इंदापूर तालुका काँग्रेस भवन चा निर्णय न्यायालयात आमच्या बाजूने झालेला आहे. मे. कोर्टाच्या माध्यमातून त्याचा ताबा लवकरच रीतसरपणे आम्ही घेणार आहोत असेही नूतन जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष लहु आण्णा निवंगुने यांचे इंदापूर येथे प्रथम आगमना निमित्त इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान यांच्या हस्ते स्वागत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तानाजी भोंग,कार्याध्यक्ष ॲड नितीन सोनवले, तालुका उपाध्यक्ष भगवान पासगे, माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव व वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे , इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान, निवास शेळके, दत्तात्रय देवकर, जाकीर काझी, सरफुद्दीन शेख यांचे सह यांचे सह अनेक आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेस पक्षवाढीच्या दृष्टीने संघटन बांधणी,शेतकऱी, कष्टकरी, बहुजन नागरिक, विद्यार्थी, महिला, वाढती महागाई, तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ इत्यादी विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


0 टिप्पण्या