सय्यद 卐 जहागीरदार शुभविवाह थाटाने संपन्न

 सय्यद 卐 जहागीरदार शुभविवाह थाटाने संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/05/2026 :

इब्राहिम पापामियां सय्यद यांची नात व हासिम इब्राहिम सय्यद अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची मुलगी       सोफिया आणि दिलावर इस्माईल जहागीरदार यांचा नातू व अब्दुल दिलावर जहागीरदार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांचा मुलगा मोईन यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक 22/ 5/ 2026 रोजी सकाळी ११ : ०५ वाजता  संपन्न झाला.

स्वयंवर मंगल कार्यालय पंचवटी, अकलूज - माळीनगर रोड, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी दोन्ही बाजूकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधूवराना शुभाशिर्वाद दिले. सय्यद आणि जहागीरदार परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

सय्यद आणि जहागीरदार विवाह सोहळ्याप्रसंगी नवरदेव मोईन जहागीरदार यांचे समवेत, हर्ष शरफु शेख यांनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ॲड. शरफु एम्. शेख (नोटरी भारत सरकार), अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक व सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, साजिद सय्यद, दादा मोहोळकर, अमित कुंभार इत्यादी दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या