सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “पीसीबी डिझायनिंग” प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “पीसीबी डिझायनिंग” प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/05/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ११ मे २०२६ ते १३ मे २०२६ या कालावधीमध्ये पीसीबी डिझायनिंग प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा संशोधन स्तर उंचाविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले आहे. 

सदर कार्यशाळेमध्ये संशोधन विभागातील तज्ञ अभ्यासक  संदीप झगडे (ऑटोमॅटि इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती) पीसीबी डिझायनिंगचा मुख्य उद्देश, इलेक्ट्रॉनिक घटकांना इलेक्ट्रिकल जोडणी सुलभ करणे,जागेची बचत,सर्किटची विश्वसनीयता आणि स्थिरता उत्पादन व चाचणी सुलभ करणे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल कोकरे  व कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. पोळ के.ए. तसेच सर्व कर्मचारी  हे काम  पाहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या