विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/05/2026 :

सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने खेळण्यात आणि मजा करण्यात तुम्ही सगळे दंग असाल. आपल्या आवडीच्या गोष्टी करताना सर्व काही विसरून तुम्ही त्यामध्ये गुंग होऊन जाता, खरे ना?

पण नेमके अभ्यासाला बसले की मन इकडेतिकडे भटकू लागते. कधी घडून गेलेल्या जुन्या गोष्टी आठवतात, तर कधी उद्या काय करायचे याचे नियोजन मनात सुरू होते. म्हणजेच, शरीर वर्तमानकाळात असते आणि मन मात्र भूतकाळात किंवा भविष्यकाळात वावरत असते.

मुलांनो, नेहमी वर्तमानकाळात जगायला शिका. आपण जी गोष्ट करत आहोत—मग ते लिहिणे असो वा वाचणे—त्यात आपले मन पूर्णपणे गुंतलेले हवे. तसे झाले नाही, तर आपण काय लिहिले किंवा काय वाचले, हे डोक्यात शिरतच नाही. आपल्याला वाटते की आपण खूप अभ्यास केला; पण तो लक्षातच राहिला नाही, तर त्याचा काय उपयोग?

आपण जे काम करत असतो, त्यात आपले मन असणे म्हणजेच आपण वर्तमानकाळात असणे होय.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या